Mumbai airport : देशात प्रचंड बेरोजगारीमुळे रोजगाराच्या संधींसाठी तरुणांची मोठी गर्दी होत आहे. गुजरात नंतर आता आणखी एक धक्कादायक बेरोजगारीचे वास्तव समोर आले आहे. मुंबई विमानतळावर लोडर्सच्या 600 जागांच्या भरतीसाठी तब्बल 25,000 हजार तरूणांनी गर्दीकेल्याचे समोर आले आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने लोडर्सच्या 600 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केल्यानंतर मुंबई विमानतळावर (Mumbai airport) काल चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
या भरतीसाठी तब्बल 25,000 हून अधिक अर्जदारांनी अर्ज केले. त्यामुळे एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना आणि विमानतळ अधिकाऱ्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. गेट क्रमांक 5 बाहेर हा गोंधळ झाल्यामुळे विमानतळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. (Mumbai airport)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इच्छुक अर्जदार तरुण एकमेकांशी धक्काबुक्की करत, फॉर्म आणि कागदपत्रे काउंटरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अर्जदारांना तासन् तास अन्न आणि पाण्याशिवाय थांबावे लागले. या परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
Mumbai airport
एअरपोर्ट लोडर्सना विमानात सामान लोड करणे, उतरवणे आणि बॅगेज बेल्ट आणि रॅम्प ट्रॅक्टर चालवण्याचे काम दिले जाते. प्रत्येक विमानासाठी किमान पाच लोडर्सची आवश्यकता असते. प्रचंड गर्दीमुळे कंपनीने फक्त अर्ज आणि कागदपत्रे स्वीकारून मुलाखती थांबवल्या.


हेही वाचा :
केदारनाथमधून तब्बल 228 किलो सोने गायब, शंकराचार्यांनी केला गंभीर आरोप
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर
कृषी महाविद्यालय, सोनापूर अंतर्गत भरती
Nagpur : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 97 जागांसाठी भरती
गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ
मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना