Saturday, May 18, 2024
Homeबॉलिवूडआणखी एका अभिनेत्याची आत्महत्या : पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला

आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या : पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला

मुंबई  : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील स्टार्सच्या आत्महत्या सुरूच आहे. टीव्ही अभिनेता समीर शर्माने आत्महत्या केली आहे. त्याने मुंबईतील आपल्या घरी आत्महत्या केली. समीर शर्माने ‘कहानी घर-घर की’ या मालिकेत काम केले होते. आत्महत्ये प्रकरणी मालाड पोलिसांनी एडीआर नोंदविला आहे.

मालाड वेस्टमधील नेहा सीएचएस बिल्डिंगमध्ये समीर शर्मा (वय 44) याचा स्वत: च्या घरात गळफास घेऊन मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2-3 दिवसांपूर्वी अभिनेत्याने आत्महत्या केली. कारण जेव्हा पोलिस फ्लॅटच्या आत आले तेव्हा मृतदेह सडण्यास सुरवात झाली होती. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरने या वर्षी फेब्रुवारीमध्ये हे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. बुधवारी रात्रीच्या ड्युटी दरम्यान चौकीदाराला समीर शर्माचा मृतदेह लटकलेला दिसला. समीरचा मृतदेह किचनमध्ये पंखावरून लटकला होता. पोलिसांना सुसाइड नोट मिळालेली नाही. संपूर्ण घराची सर्च ऑपरेशन चालू आहे. या प्रकरणात पोलिस आर्थिक कोनातूनही तपास करत आहेत.

समीर शर्मा कोण होते?

समीर शर्माने बर्‍याच टेलिव्हिजन शोमध्ये काम केले. कहानी घर घर की, ये रिश्ते हैं प्यार के, लेफ्ट राइट लेफ्ट, ज्योति, गीत हुई सबसे पराई, 2612, दिल क्या चाहता है, वीरानगली, वो रहने वाली महलों की, आयुष्मान भव, इस प्यार को क्या नाम दूं? एक बार फिर, भूतू में नजर आए थे. सध्या ते ‘ये रिश्ते हैं प्यार के’ मध्ये शौर्या महेश्वरी यांची भूमिका साकारत होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय