Saturday, April 27, 2024
Homeराज्यसिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन, मनोरंजनविश्वात शोककळा

सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन, मनोरंजनविश्वात शोककळा

मुंबई : सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep patwardhan) यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.

मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी गेली अनेक वर्ष आपल्या हसऱ्या स्वभावानं आणि उत्तम कॉमेडी टाईमिंगने रसिकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अश्या भावना व्यक्त केल्या जात आहे.

प्रदीप पवर्धन यांचे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट, पोलीस लाईन, एक शोध, थॅक्यू विठ्ठला, एक फुल चार हाफ, डान्सपार्टी असे अनेक सिनेमे गाजले. यासोबतच त्यांनी हास्य जत्रेतून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं. अश्या अवलियाचं अकाली जाणं अनेकांसाठी धक्कादायक आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय