Friday, April 19, 2024
Homeग्रामीणलोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त डीवायएफआय कडून पूर्णेत गीत-गायन स्पर्धा

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त डीवायएफआय कडून पूर्णेत गीत-गायन स्पर्धा

पुर्णा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया पूर्णा तालुका व पूर्णा शहर समितीकडून गीत-गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्वेता भगवान दिपके, प्राजक्ता राहुल अहिरे, सविता राहुल अहिरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले. या विजेत्यांशीवाय गौतम काळे, केशव जाधव आणि मिलिंद उत्तम गवळी यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी गरीब, कष्टकरी निम्न जातीवरील होणारे अन्याय अत्याचार आणि त्यांच्या जीवनातील वास्तव त्यांनी लेखणी व गायनाच्या माध्यमातून मांडले. डाव्या चळवळीत काम करतांना त्यांनी शोषितांचे (सामाजिक – आर्थिक) लढे लाल बावटा पथकाच्या माध्यमातून शाहिरीतून मांडले. त्यांच्या विचारावर चालणाऱ्या डीवायएफआय या संघटनेनी गायन स्पर्धेच्या माध्यमातून सांस्कृतिक पर्याय निर्माण करित अण्णाभाऊंचे विचार व कार्य युवकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले, प्रा. राजेश पर्लेकर, युवा कलाकार संदीप वेडे उपस्थित होते. तसेच डीवायएफआय संघटनेचे जिल्हा कमिटी पदाधिकारी नसीर शेख, अमन जोंधळे, क्रांती बुरखुंडे, जय एंगडे, तालुका पदाधिकारी अमृता कुऱ्हे, अजय खंदारे आणि शहर पदाधिकारी संग्राम नजान, किरण खंदारे, वैभव जाधव, राज जोंधळे व सुबोध खंदारे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण भुजबळ यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय