Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याSharad Pawar : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता...

Sharad Pawar : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

Eknath Khadse : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शरद पवार (Sharad Pawar) गटाला लवकरच मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वातील नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप प्रवेश करावा अशी विनंती करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी देखील नुकताच दिल्ली दौरा केला. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो देखील समोर आला होता. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची घरवापसी होणार असून गुढीपाडव्याला ते भाजप मध्ये प्रवेश करू शकतात.

एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश केल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होऊ शकते.

रोहिणी खडसे यांची भूमिका

रोहिणी खडसे या शरद पवार गटामध्येच (Sharad Pawar) असणार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत त्यांनी ट्वीट करत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबतच राहू अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. महिला परिषदेचं अध्यक्षपद रोहिणी खडसे यांच्याकडे आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे हे २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते. परंतू पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

संबंधित लेख

लोकप्रिय