Kangana Ranaut : कंगना राणौत आता राजकारणात चांगलीच सक्रिय झाली आहे. कंगना राणौतला भाजपने देखील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीत उतरवली आहे. अशातच एका कार्यक्रमात ती पोहोचली तेव्हा तिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल वक्तव्य केले, त्यानंतर तिने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. आता अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक दीर्घ खुलासा शेअर करत या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका हिंदी वाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान देशाच्या पहिल्या पंतप्रधानांशी संबंधित वक्तव्य केले होते. शुक्रवारी (5 एप्रिल) रोजी कंगना नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशाचे पहिले पंतप्रधान म्हणताना दिसली होती. ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. यावर आता कंगना रणौतने टीकाकारांना प्रत्यूत्तर दिले आहे.
कंगना रणौतने ५ एप्रिलला लिहिले की, ‘जे मला भारताच्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल ज्ञान देत आहेत त्यांनी हा स्क्रीनशॉट वाचावा. नवशिक्यांसाठी येथे काही गोष्टी आहेत. जे लोक मला अभ्यास करायला सांगत आहेत त्यांना हे माहित असावे की मी आणीबाणी नावाचा चित्रपट लिहिला आहे. त्यात अभिनय आणि दिग्दर्शनही केले. त्याची कथा प्रामुख्याने नेहरू कुटुंबाभोवती फिरते. जर मी तुमच्या IQ च्या पलीकडे बोलले तर तुम्हाला असे वाटू लागते की मला याची माहिती नसेल. त्यामुळे तुमची खिल्ली उडवली गेली आणि तीही अत्यंत वाईट पद्धतीने. अशी पोस्ट कंगणाने सोशल मीडिया एक्स वर लिहले आहे.
कंगना राणौतच्या स्क्रीनशॉटमध्ये काय आहे?
अभिनेत्री कंगना राणौतने एनडीटीव्हीवरील एका बातमीच्या लेखाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. त्यात म्हटले आहे, ’21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वातंत्र्य सेनानी नेताजींनी सिंगापूरमध्ये आझाद हिंद (स्वतंत्र भारत) सरकारची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धाच्या घोषणेच्या वेळी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतःला पंतप्रधान, राज्यप्रमुख आणि युद्धमंत्री इत्यादी घोषित केले होते.’
हे ही वाचा :
आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!
बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार
भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड
ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!
कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती