शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी शाळेची केली पाहणी
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरातील जयहिंद हायस्कूलमध्ये मुले व मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. (PCMC)
दरम्यान मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन पदाधिकाऱ्यांसमवेत शाळेची पाहणी केली,शाळा प्रशासनाला ‘पुन्हा असा प्रकार घडल्यास तर गाठ मनसेशी राहील, असा इशारा दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी चिंचवड शहरातील जयहिंद हायस्कूलमधील स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर विविध माध्यमातून याबाबत तीव्र आक्षेप घेण्यात आले. तर पालकांनीही याला विरोध केला होता. (PCMC)
याबाबत विचारणा करण्यासाठी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला शहराध्यक्ष सीमा बेलापूरकर, नितीन चव्हाण, मनोज लांडगे, तुषार सोनटक्के, अंकित शिंदे, अक्षय देसले, देवेंद्र निकम, शंकर तरपडे व पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली.
संपुर्ण शाळेची पाहणी केल्यानंतर स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे मुलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, ‘शाळेत पुन्हा असा प्रकार घडल्यास तर गाठ मनसेशी राहील, असा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की, शाळेत असे प्रकार घडणे अत्यंत संतापजनक आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणून लौकिक मिळविलेल्या पुण्यात असे प्रकार सहन केले जाणार नाहीत.तसेच शाळा व्यवस्थापनाने पालकांना विश्वासात घेऊन सीसीटिव्ही बसवण्याबाबत समंती घेऊन फुटेज कंट्रोल वर नियंत्रण ठेवणे अपेक्षित होते.
शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी मनसे सदैव तत्पर आहे.शिक्षण विभागाने या गैर प्रकाराची तात्काळ दखल घेत कारवाई करावी,अशी मागणी सचिन चिखले यांनी केली.
अखेर शिक्षण विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे हटविले
पिंपरी चिंचवड शहरातील जयहिंद हायस्कूल मधील स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिंपरी महापालिकेच्या शिक्षण विभागालाही खडबडून जाग आली. प्रशासनाने शाळेत जात तेथील कॅमेरे हटवले आहेत. तसेच शाळेला याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !
Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले