सोशल मीडिया वरून चाहत्यांना दिली गुड न्यूज
पंजाब : पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाची मागील वर्षी निघून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गटाच्या गुंडांनी त्याची हत्या केली. सिद्धू च्या आई-वडिलांना सिद्धू हा एकुलता एकच मुलगा असल्याने उतार वयामध्ये त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी त्यांना एका मुलाची आवश्यकता होती. त्यांच्या आई-वडिलांनी ही रिस्क घेतली आणि आय व्ही एफ या तंत्रज्ञानाचा वापर करून वयाच्या 58 व्या वर्षी सिद्धू मुसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला. आई आणि मुलगा सध्या सुखरूप असून सिद्धूच्या वडिलांनी इंस्टाग्राम वर बाळाचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. (Siddhu mother delivery baby)
सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन बाळाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते बाळाला घेऊन बसल्याचं दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला सिद्धू मुसेवालाचा फोटो आहे. “सिद्धूवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या आशीर्वादाने त्याच्या छोट्या भावाचा जन्म झाला आहे. वाहेगुरूंच्या आशीर्वादाने दोघेही सुखरुप आहेत. हितचिंतकांचे आभार,” असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.(Siddhu mother delivery baby)
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून २९ मे २०२२ रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. एकलुता एक मुलाच्या हत्येनंतर त्यांनी आयव्हीएफ(IVF)च्या माध्यमातून पुन्हा आईवडील होण्याचा निर्णय घेतला होता. या वयात आई होणार असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच सिद्धू मुसेवालाच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर आलं होतं. आता त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.(Siddhu mother delivery baby)
हे ही वाचा
अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक
महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मतदान, वाचा वेळापत्रक
मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका
महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा
धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले