दिल्ली(२० मे):
कोरोनाच्या महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्राचे वेळापत्रक कोलमडले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला, परंतु लॉकडाऊनमध्ये परिस्थितीचे गंभीर्य ओळखून तीन वेळा वाढ करण्यात आली. अनेक राज्यातील बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या परिक्षा रद्द होणँयाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज्यांच्या मागणीनुसार केंद्राने दहावी बारावीच्या परिक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. केंद्राने याविषयी नियमावली जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे.