Friday, November 22, 2024
Homeराष्ट्रीयकेंद्र सरकारच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

केंद्र सरकारच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

कोल्हापूर(20 मे) :

          केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत जोरदार निदर्शने करण्यात आली.

         स्थलांतरित मजुरांसाठी अधिकाधिक रेल्वे आणि बस सेवा उपलब्ध करून द्यावी,त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी,सर्व मजूरांना 10000 रु.प्रवास भत्ता द्यावा, मनरेगा अंतर्गत गावातच नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, कोणत्याही अटी आणि शर्थीविना सर्वांना सरसकट रेशन द्यावे अशा प्रमुख मागण्यांसाठी केलेल्या निदर्शनावेळी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या फसव्या आर्थिक पॅकेजचा निषेध करण्यात आला.

         या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव नामदेव गावडे, जिल्हा सचिव सतिशचंद्र कांबळे, जिल्हा कौन्सिल सदस्य शिवाजी माळी,  दिलदार मुजावर, रियाज काजी, रियाज शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय