Thursday, November 21, 2024
Homeजिल्हाआदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंतवर अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करा -...

आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंतवर अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करा – बिरसा क्रांती दल

नाशिक : अंगप्रदर्शन अश्लील व्हिडिओ द्वारे आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) वर सायबर क्राईम व ॲट्राॅसिटी (atrocity) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा क्रांती दल (Birsa Kranti Dal) नाशिक (Nashik) जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाडवी यांनी पोलिस निरीक्षक पेठ तालुका यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, अभिनेत्री राखी सावंत यांनी आदिवासी समाजाला उद्देशुन अश्लील अंगप्रदर्शनाची कृती करत व्हिडिओ बनवून तो इंस्टाग्राम व व्हाटस्अॅप अशा सोशल मीडियावर टाकून संपूर्ण आदिवासी समाजाची बदनामी केली आहे व आदिवासी समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ, संताप निर्माण होईल यासाठी आक्षेपार्ह वाईट कृती केली आहे.राखी सावंतांच्या या वाईट कृत्याचा बिरसा क्रांती दल नाशिक जिल्हा संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे.

सुरगाणा येथे DYFI चे राज्य अधिवेशन, देशातील दिग्गज नेत्यांची असणार उपस्थिती

राखी सावंत यांनी “मेरा ये लुक देख रहे हैं,आज पुरा ट्रायबल लूक , आदिवासी आदिवासी इसको कहते हैं,हम तो लुकस हैं और ये देखिये भुम भुम टरारा भुम भुम!” असं अश्लील शब्दात अश्लील शारीरिक कृतीतून आदिवासी समाजाला बदनाम केले आहे. आदिवासी समाज शांतताप्रिय व प्रामाणिक आहे. या शांतताप्रिय समाजाला अश्लील व्हिडिओ द्वारे जाणीवपूर्वक भडकावणयाचे काम राखी सावंत यांनी केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी योगिराज भांगरे, नाशिक जिल्हा महासचिव किशोर माळी व बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

विशेष लेख : जागतिक वसुंधरा दिन!

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 75 हजार रुपये पगाराची नोकरी


संबंधित लेख

लोकप्रिय