Friday, November 22, 2024
Homeसंपादकीयजनभूमी पडताळणीसिमा रेषेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबद्दल अपप्रचार करणाऱ्या पोस्ट;...

सिमा रेषेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबद्दल अपप्रचार करणाऱ्या पोस्ट; वाचा सत्य

? पोस्टमध्ये काय आहे?

    सीपीआयएम नेत्यांचे हातात फलक घेऊन आंदोलन करतानाचे फोटो शेयर करून म्हटले की, “भारतीय लष्कराने चीनच्या 5 सैनिकांना उडवल्यानंतर कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी दिल्लीत रॅली काढून घोषणाबाजी केली” असल्याचे पोस्ट शेअर होत आहेत.

  ? पोस्टची पडताळणी

    हे फोटो कम्युनिस्ट पक्षातर्फे 16 जून रोजी दिल्लीतील मुख्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनातील आहेत. ‘सीपीआयएम’ पक्षाच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक पेजवरून ते शेयर करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या नागरिक-विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हातातील फलकावर गरीबांना 10 किलो रेशन देण्याची मागणी लिहिलेली आहे.

     केंद्र सरकार कोरोनाविषाणूच्या संसर्गाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मंदावलेल्या आर्थिक विकासाचा निषेध करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षातर्फे 16 जून रोजी देशव्यापी आंदोलन पुकरण्यात आले होते. देशातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्षातर्फे सोशल डिस्टन्सिंग राखत मोर्चे व घोषणाबाजी करण्यात आली होती.       

          दहिंदु, न्यूजक्लिक, दैनिक भास्कर यासह देशातील सर्व मीडियाने या आंदोलनाविषयी बातम्या केल्या. त्यानुसार, लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी लोकांचा रोजगार बुडाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्राप्ती करमर्यादेच्या बाहेरील लोकांना पुढील सहा महिन्यांसाठी दरमाह 7500 रुपये आणि दहा किलो मोफत रेशन द्यावे, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे. दिल्ली येथील ‘सीपीआयएम’ मुख्यालयामसोरील आंदोलनात सरचिटणीस सीताराम येचुरी, पोलिट ब्युरोचे सदस्य वृंदा करात, प्रकाश करात, तपन सेन आदी उपस्थित होते.

    भारत-चीन संघर्षाविषयी ‘सीपीआयएम’ने 16 जून रोजी पत्रक काढून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच सीमेवरील तणावाविषयी चिंता व्यक्त करीत कम्युनिस्ट पक्षाने भारत सरकारने संघार्षाबाबत त्वरित अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच चीन व भारताने चर्चा करून तोडगा काढावा असेही यामध्ये म्हटले आहे.

   ? निष्कर्ष 

   या पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा असून लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा पोस्ट शेअर केल्या जातात.

संबंधित लेख

लोकप्रिय