ता-सांगोला
नाझरा : सध्या देशात आणि जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आता तर खेड्यागावात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या परिस्थितीतून शासकीय कार्यालयात काम करताना अथवा कामासंबंधी गेले असता कोरोनाशी दोन हात कसे करता येतील यासाठी नाझरा ग्रामपंचायतने विशेष उपक्रम राबवला आहे.
नाझरा ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातुन गावातील शाळा व हायस्कूल मध्ये सानेटाझरच्या मशिनी बसविण्यात येणार आहेत. हा उपक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून सूचित करण्यात आला. विशेष म्हणजे असा उपक्रम तालुक्यामध्ये प्रथमच नाझरा ग्रामपंचायतने केला आहे. या उपक्रमाचे गावातील नागरिक, शिक्षक व विद्यार्थी यांनी स्वागत केले आहे.
नाझरे गावातील ग्रामस्थांनी सरपंच हणमंत सरगर, उपसरपंच नागेश रायचुरे, ग्रामसेवक लोहार यांचे आभार मानले. यावेळी सरपंच हणमंत सरगर यांनी गावातील प्रत्येक कामात तत्पर राहील व गाव विकासाची कामे नेहमीच केले जातील असा विश्वास दिला.