ता-सांगोला
नाझरा : सध्या देशात आणि जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आता तर खेड्यागावात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. शिक्षणा बाबत पालकांची उदासीनता दिसून येत आहे . या परिस्थितीतून विद्यार्थ्यांना सुरक्षित व शिक्षकांना काम करताना अथवा कामासंबंधी गेले असता कोरोनाशी दोन हात कसे करता येतील यासाठी नाझरा ग्रामपंचायतने विशेष उपक्रम राबवला आहे.
नाझरा ग्रामपंचायतीच्या वतीने 14 वा वित्त आयोग मार्फत श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज ना झरेला ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन सप्रेम भेट देण्यात आली . प्रशालेचे प्राचार्य परिचारक सर यांनी ग्रामपंचायत चे आभार मानले .याप्रसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच हनुमंत सरगर , उपसभापती सुनील भाऊ चौगुले , ग्रामसेवक प्रदीप लोहार साहेब , संस्था सचिव मुकुंदराव पाटील , प्राचार्य प्रकाश परिचारक तसेच सोमनाथ जुधळे पत्रकात रविराज शेटे माझी पर्यवेक्षक काझी सर व विजय गोडसे सर , अशोक बनसोडे सर , शहाजहन मुलाणी सर , सौरभ पाटील सर , सतीश विभुते सर , कर्मचारी दत्ता डांगे ग्रामपंचायत कर्मचारी बंडू काकडे व इतर उपस्थित होते