Monday, November 25, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : निगडी पर्यंत मेट्रो विस्ताराच्या 'मनसे'च्या मागणीला यश, नागरीकांना पेढे वाटुन...

PCMC : निगडी पर्यंत मेट्रो विस्ताराच्या ‘मनसे’च्या मागणीला यश, नागरीकांना पेढे वाटुन आनंद उत्सव साजरा

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरीकांना मेट्रो प्रवासाचा लाभ आता निगडी पर्यंत घेता येईल. या विस्ताराला केंद्रसरकारने मंजुरी दिल्याबद्दल भक्ती शक्ती चौक निगडी येथे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटले.

निगडी पर्यंत मेट्रो असावी अशी सर्व शहरवासीयांची इच्छा होती, परंतु पहिला टप्पा पिंपरी ते दापोडी असा झाला व काम ही पुर्ण झाले त्यामुळे निगडी पर्यँत  मेट्रो येईल का नाही अशी चिंता निगडी, आकुर्डी व चिंचवड मधिल सर्वसामान्य नागरीकांना होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व पदाधिकारी यांनी पासुन निगडी पर्यन्त मेट्रो साठी 2016-2017 या काळात मेट्रो विस्तार निगडी व्हावा, यासाठी आम्ही केलेल्या आंदोलनास यश मिळाले आहे, असे मनसे शहरअध्यक्ष – सचिन चिखले यांनी म्हटले आहे. आज खऱ्या अर्थाने त्या प्रयत्नांना यश आले निगडी पर्यन्त मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आज केंद्र सरकारची मान्यता भेटली आहे . निगडी पर्यंत च्या मेट्रोच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाची मान्यता भेटली आहे.

पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके असतील. या विस्तारित मार्गासाठी होणाऱ्या खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. हा प्रस्तावित कॉरिडॉर 4.13 किमी लांबीचा असून तो एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून बांधला जाईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च 910.18 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आता लवकरच निगडीपर्यंतच्या मेट्रो कामाला सुरुवात होईल. वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.

आम्ही केलेल्या मागणीला खऱ्या अर्थाने यश आले आहे, राज्य सरकार व केंद्र सरकार व विविध संघटनाचे असे मनसे अध्यक्ष सचिन चिखले यांनी आभार मानले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय