ॲड. असिम सरोदे यांच्या वक्तव्यावर बाबा कांबळे यांचा तीव्र संताप (PCMC)
ईव्हीएमबाबत खासदार शरद पवार यांच्या संयमी वक्तव्याकडे वेधले लक्ष
पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर – सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, दलित, बहुजन आणि लाडकी बहिण यांच्या भरघोस मतांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. लोकशाही मार्गाने हे सरकार आले आहे. मात्र महायुतीला मिळालेले बहुमत हे राक्षसी बहुमत असल्याची टिका ॲड. असिम सरोदे यांनी केले आहे. त्यांना हे वक्तव्य शोभणारे नाही. राक्षसी बहुमत म्हणणे म्हणजे दलित, बहुजन, कष्टकरी जनतेचा अवमान आहे, असा तीव्र संताप कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला आहे. (PCMC)
तसेच देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत संयमाची भूमिका घेतली आहे. माहिती घेऊन त्यावर बोलेन असे वक्तव्य केले आहे. त्याकडेही बाबा कांबळे यांनी ॲड. सरोदे यांचे लक्ष वेधले.
बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, महायुतीला राक्षसी बहुमत मिळाले आहे. हा ईव्हीएममध्ये केलेला घोळ आहे. त्या विरोधात न्यायालयात जाणार, असे मत ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. (PCMC)
याबाबत कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महायुतीला राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. जनतेने दिलेल्या मताचा आदर करणे गरजेचे आहे. बहुमताचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.
कायद्याचा अभ्यासक असणारे ॲड. सरोदे सर्व ज्ञानी आहेत का, हे समजत नाही, असा प्रश्न बाबा कांबळे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ते ज्यांना मानतात त्या आदरणीय खासदार शरद पवार यांचे तरी शब्द ऐकावेत. खासदार शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ईव्हीएमबद्दल माझ्याकडे पुरावे येत नाही. तोपर्यंत मी याबद्दल काय बोलणार नाही असे म्हटले आहे. त्याचा तरी विचार सरोदे यांनी करावे, असे बाबा कांबळे म्हणाले.
राज्यात विरोधकांची स्पष्ट हार झाली आहे. त्यांना ती मान्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे न्यायालयात ॲड. असिम सरोदे यांना पाठवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून होतो की काय, अशा संशय येत आहे.
त्यामुळे मिळालेल्या जनमताचा आदर महाविकास आघाडीच्या प्रमूख नेत्यांनी केला आहेच. मात्र ॲड. असिम सरोदे यांनी देखील न पटणारी वक्तव्ये थांबवून जनमताचा कौल स्वाकारावा.
प्रतिक्रिया :
या निवडणुकीत महायुतीला राज्यभरातील दलित, मागासवर्गीय, बहुजन, कष्टकऱ्यांनी मतदान केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीला आमच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे.
कष्टकरी, रिक्षा चालक, टपरी-पथारी-हातगाडीधारक, असंघटित कामगार कष्टकरी आदींनी आमच्या आवाहनानंतर भरघोस मतदान केले आहे. त्यामुळे त्यांच्या मताचा आदर करणे गरजेचे आहे. राक्षसी बहुमत असे संबोधन वापरून या सर्वांचा ॲड. असिम सरोदे अपमान करत आहे.
बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, कष्टकरी जनता आघाडी