Friday, May 17, 2024
Homeक्रीडाविश्वसुप्रसिद्ध क्रिकेट कर्णधार बिशनसिंग बेदी यांचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला...

सुप्रसिद्ध क्रिकेट कर्णधार बिशनसिंग बेदी यांचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. भारताच्या क्रिकेट विश्वातील एक महान डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून बिशन सिंग बेदी यांना ओळखलं जातं. 40 वर्षांहून अधिक काळ ते क्रिकेट खेळत होते.

बिशनसिंग बेदी यांची 1976 मध्ये भारताचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी 1978 पर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केले. बेदी यांनी 77 आंतरराष्ट्रीय सामन्यात 273 विकेट घेतल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये 370 सामन्यांमध्ये 1,560 विकेट घेतल्या होत्या.

भारतीय कसोटी इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये बेदी यांची गणना केली जाते. क्रिकेट क्षेत्रात त्यांनी भारतीय संघाला दैदीप्यमान विजय मिळवून दिले होते. बिशन सिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर येथे झाला. 1990 मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यात बेदी काही काळ भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापक होते. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला वनडे सामना 13 जुलै 1974 रोजी लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध खेळला होता, तर शेवटचा एकदिवसीय सामना 16 जून 1979 रोजी मँचेस्टर येथे श्रीलंकेविरुद्ध खेळला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय