Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते - काशिनाथ नखाते

PCMC : यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते – काशिनाथ नखाते

यशवंतराव चव्हाण यांना कामगारांकडून अभिवादन (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – . दि.२५ – महाराष्ट्र राज्याचे नवनिर्मिमान व पायाभरणीच्या काल्यावधीत महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याची पायाभरणी यशवंतरावांनी केली. कृषी, उद्योग,एमआयडीसी,रोजगार निर्मितीमध्ये महत्त्वाचे कार्य केले यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. (PCMC)

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त आज चिंचवड येथे कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार समितीतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.

राज्याची पायाभरणी सुरू असताना राज्याची अस्मिता जपून नवे आर्थिक स्त्रोत तयार करून सामाजातील उपेक्षित वंचित वर्गांना नव्या रचनेत समान संधी देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे काम पाहिले आदर्श मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यानी केले.
यशवंतराव चव्हाण यांनी समतोल विकासाचे धोरण आखले होते.
शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक,औद्योगिक,सांस्कृतिक अशा विविध घटकांसाठी योजना राबवत असताना अविकसित भागांचा, गावांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी असा त्यांचा मानस होता.

यावेळी कार्याध्यक्ष राजू बिराजदार, उपाध्यक्ष राजेश माने, मनपा समिती सदस्य किरण साडेकर, ओमप्रकाश मोरया,अर्चना गादेकर,पूजा जाधव, लाला राठोड, यक्षमा दळवी, सुप्रिया सूर्यवंशी, भागमा मदार, उषा आव्हाड, विजया टोणपे, विश्वनाश राठोड,अनिल गादेकर, राजू टोणपे आदी उपस्थित होते .

संबंधित लेख

लोकप्रिय