Saturday, May 18, 2024
Homeराज्यज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया – निवृत्त न्यायमूर्ती के.के.तातेड

ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया – निवृत्त न्यायमूर्ती के.के.तातेड

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही केवळ आपली जबाबदारी नाही, तर आपले कर्तव्यच आहे. ज्या ज्येष्ठांना मदतीची, आधाराची गरज असते त्यांना आधार देण्याचा संकल्प करू या, असे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती के.के.तातेड यांनी सांगितले. Let us resolve to support senior citizens – Retired Justice K K Tated

राज्य मानवी हक्क आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या यंत्रणा आणि शासकीय योजनांची माहिती या विषयावर जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी उपस्थित होते.

श्रीमती प्रभावळकर म्हणाल्या की, केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे रक्षण व त्यांचा उदरनिर्वाह, वैद्यकीय उपचाराकरिता संरक्षण कायदा केलेला आहे. त्यांनी याचा गरजेनुसार वापर करावा.

डॉ. शेट्टी म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. निरोगी राहण्याकरीता आवश्यक झोप घेणे, वेळेवर जेवण करणे इत्यादी बाबी त्यांनी समजावून सांगितल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य एम. ए. सय्यद यांनी केले. तर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जय जाधव यांनी आभार मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय