Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चिंचवडच्या 'ब' प्रभाग कार्यालयात नागरिकांसाठी बैठक कक्षाची व्यवस्था करा –...

PCMC : चिंचवडच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयात नागरिकांसाठी बैठक कक्षाची व्यवस्था करा – मधुकर बच्चे 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मनपाच्या चिंचवड मधील पालिकेची  ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाची नव्याने बांधलेली इमारत जनतेला अपेक्षित अशीच  सुंदर आणि प्रशस्त भव्य दिव्य उभारली आहे. तेथे विविध प्रशासकीय विभागाचे कामकाज चालते, पण बऱ्याच विभागात मोठे घर पोकळ वासा!जनतेने जमिनीवर येऊन बसा! अशी अवस्था आहे, या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर (मेरेज सर्टिफिकेट)  विवाह नोंदणी विभाग आहे, या विभागात येणाऱ्याची मोठी वर्दळ असते एका कुटुंबासोबत किमान पाच ते सहा लोक असतात व या विभागात सर्व कागदपत्रे पडताळणी होतात सहाजिकच या कामास काही वेळ लागतोच म्हणजे तो पर्यंत नागरिकांना एक तर ताटकळत उभे रहावे लागते किंवा जमिनीवर बसावे लागते हे दुर्देव आहे, याबाबत भाजप शहर सचिव मधुकर बच्चे यांनी ‘ब’ प्रभाग अधिकारी अमित पंडीत यांना निवेदन देऊन नागरिकांसाठी प्रत्येक विभागात बैठक सुविधायुक्त बैठक कक्ष व्यवस्थापन करावे अशी मागणी केली आहे.

कार्पोरेट कंपन्या, बँकांसारखे स्वागत कक्ष असावेत

नागरिक व प्रशासन यांचा मनपाच्या सर्व कार्यालयात दैनंदिन कार्यालयीन संबंध असतो,पिंपरी चिंचवड शहरात विविध कार्पोरेट कंपन्या व बँका यांचे हवेशीर सुविधायुक्त स्वागत कक्ष आहेत. तेथे बसण्यासाठी आरामदायी व्यवस्था असल्यामुळे विंडोवर गर्दी होत नाही, नागरिक परेशान होत नाहीत, त्यामुळे एवढा आवाढव्य खर्च करून प्रशस्त इमारत बांधून ज्या नागरिकासाठी हे सर्व केले त्यांनाचा बसण्याची व्यवस्था नसावी हे अत्यन्त दुर्दैवी आहे, याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांनी तातडीने विवाह नोंदणी व इतर विभागात पाहणी करून नागरिकांसाठी तातडीने बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव मधुकर बच्चे यांनी प्रभाग अधिकारी अमित पंडीत यांचेकडे केली आहे. 

याबाबत त्यांनी निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल, असे सांगितले मात्र पंधरा दिवसात व्यवस्था करा अन्यथा गांधीगिरी पद्धतीने  स्वखर्चाने त्या विभागात लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाईल. याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा मधुकर बच्चे यांनी इशारा दिला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय