Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड"PCMC : वृक्षसंवर्धन व प्लास्टिक मुक्त पर्यावरण  ही काळाची गरज आहे"

“PCMC : वृक्षसंवर्धन व प्लास्टिक मुक्त पर्यावरण  ही काळाची गरज आहे”

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : गुणवंत कामगार कल्याण मंडळ,पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने  रविवार आॕक्टोंबर २०२३ रोजी घोरावडेश्वर टेकडी येथे ट्रेकींग आणि स्वातंत्र्यवीर सावकर मंडळ निसर्गमित्र विभाग यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर  मंडळ निसर्गमित्र माध्यमातून मागील 15 वर्षापासून टेकडीवर चर खोदून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम केले जाते. सह्याद्री पर्वतावरील जैव विविधता लक्षात घेऊन आज येथे विशेष रोपांची लागवड करण्यात आली.

गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या सदस्यांनी ट्रेकिंग करत टेकडीच्या मध्यावर काही विशेष रोपांची लागवड करुन वृक्षारोपण केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या माध्यमातून केवळ वृक्षारोपण केले जात नसून वर्षभर त्याची काळजीही घेतली जाते. याचे कौतुक करुन या टेकडीवरील पर्यावरण स्वच्छता, वृक्ष संवर्धन व प्लास्टिक कचरा उचलण्यासाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळ सर्वोतपरी साहाय्य करील. असे आवाहन मंडळाचे सचिव राजेश हजारे यांनी केले.


एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर विजय सातपुते यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या कार्याबाबत सविस्तर माहीती दिली.वसुंधरा पर्यावरण प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष तानाजी एकोंडे यांनी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष महंमदशरीफ मुलाणी व कामगार नेते राजेंद्र उभे यांनी सावरकर मंडळ व सर्व उपस्थितांचे आभार मानले. स्वातंत्र्यवीर सावरकर निसर्ग मित्र विभागाचे रोहिदास जाधव व इतर सहकारी यांना गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कार्यासाठी लागणारे टिकाव, फावडे, घमेले व पाच विळे (खुरपे) भेट देण्यात आले.
गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे श्रीकांत जोगदंड, सतिष देशमुख, शिवाजी पाटील, अशोक यादव, काळुराम लांडगे, विकास कोरे, बाबासाहेब साळुंके, संगिता जोगदंड, रेणुका हजारे रघुनाथ फेगडे, कडूबाळ शिंदे, विकास शहाणे, मिना करंजावणे, सारंगी करंजावणे, ऊमेश फाळके, अभिषेक व मिहिर हजारे यांचेसह अनेक युवा विद्यार्थी, महिला व कामगार बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय