पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,जनवादी महिला संघटना व सिटू कामगार संघटनेच्या वतीने टिळक पुतळा निगडी येथे माणिपूर मधील महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचारामुळे देशातील समाजमन ढवळून निघाले आहे. मागील तीन महिन्यांपासून मणिपूर मध्ये दोन जमातीमध्ये जातीय संघर्ष पेटला असूनही राज्यसरकार व केंद्र सरकार तटस्थ भूमिका घेत आहे, जातीय विद्वेषात शेकडो लोक मृत्युमुखी पडून दोन्ही बाजूच्या सामान्य जनतेला विस्थापित व्हावे लागले आहे. महिलांना नग्न करून धिंड काढणाऱ्या या प्रवृत्ती देशविघातक आहेत. मणिपूरच्या अस्थिरतेला जबाबदार असलेल्या केंद्र राज्यसरकारचा आम्ही निषेध करत आहोत, असे माकप पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे यांनी सांगितले.
आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचेपुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे अखिल भारतीय जनवादी महिलांना संघटनेच्या नेत्यां अपर्णा दराडे यांनी केंद्र सरकारवर आपल्या भाषणातून टीका करत असताना असे म्हटले की मोदी सरकार एकीकडे बेटी बचाओ, बेटी पाढाओ असे म्हणत आहे आणि त्याच वेळी गुजरात मध्ये बिलकीस बानो प्रकरणातील बलात्कारी आरोपींचा सत्कार करीत आहे, उनाव किंवा आताचे दिल्लीतील पहिलवान मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण असो, सर्वच ठिकाणी केंद्र सरकारने महिला आणी मुलींवर बलात्कार करणाऱ्याला पाठीशी घातल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सरकारचा निषेध किती करावा तो थोडाच आहे, असे जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा दराडे यांनी म्हटले आहे.
यावेळी तहसीलदार निर्मला निकम यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सुषमा इंगोले, नंदा शिंदे, निर्मला येवले, जगत देवी सुनीता उघडे, अनिता उघडे, श्रीदेवी गायकवाड, लक्ष्मी अवलोल, सुरेखा उद्यागर, अहिल्या घोडके, बाळासाहेब घस्ते, विरभद्र स्वामी, मरपा अवलोल, डॉ.कॉम्रेड बाबासाहेब देशमुख इत्यादी सहभागी झाले होते.
हे ही वाचा :
पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड
ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’
डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’
हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे
सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर