बुलढाणा अपघातात कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : शिरुर येथील निरगुडसर येथे शिक्षक असलेले कैलास गंगावणे आणि त्यांच्या पत्नी व मुलीचा बुलढाणा येथील बस अपघातात मृत्यू झाला. संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी गंगावणे कुटुंबियांचे सांत्वन केले. या भयंकर दु:खातून सावरण्यासाठी प्रार्थना केली.
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात निरगुडसर येथील शिक्षक कैलास गंगावणे (वय ४८), पत्नी कांचन गंगावणे (वय ३८) आणि मुलगी सई गंगावणे (वय २०) या तिघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे निरगुडसरवर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी शिरुरमध्ये गंगावणे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि धीर देण्याचा प्रयत्न केला.
आमदार लांडगे म्हणाले की, गंगावणे यांचा मुलगा आदित्य याला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते. या प्रवासात त्यांच्यावर काळाने घाला घातला. सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. अशाप्रकारे काळाने त्यांच्यावर झडप घालण्याची ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.
निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे गंगावणे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. प्रा. कैलास गंगावणे निरगुडसर येथील (ता. आंबेगाव) पं. जवाहर नेहरू विद्यालयात इंग्रजीचे शिक्षक होते. या मूळचे शिरूर तालुक्यातील गंगावणे अतिशय मनमिळावू होते, असे ग्रामस्थ सांगतात. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा असा दुर्दैवी अंत होणे, असे दु:ख कुणाच्याही वाट्याला येवू नये, असा शोक आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.
अलंकापुरीत आषाढी एकादशी दिनी लाखावर भाविकांची दर्शनास गर्दी
शहरालगत गहुंजे येथे क्रिकेट स्टेडियम असताना 400 कोटीचे मोशीत स्टेडियम ; उधळपट्टी कशासाठी ? नाना काटे यांचा सवाल
स्टॉर्म वॉटर जोडणी न केल्यामुळे चिखलीत (जाधववाडी) पाणी रस्त्यावर – स्थापत्य विभागाच्या गलथान कारभार – राजू भुजबळ