मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामीव होत, थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप झाला आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 आमदार असून यातील नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ आज महाराष्ट्र राजभवनात घेतलेली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भुमिका मांडली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यासाठी हा प्रकार नवीन नाही. जे घडलं त्यांची मला चिंता नाही, असे सांगत आपली भुमिका मांडली. ते म्हणाले, अजित पवार यांनी बंड केले आहे, उद्या पासून मी पुन्हा नव्याने पक्ष जोडणीसाठी बाहेर पडणार आहे. पक्षाच नाव घेवून कोणी निवडणूक लढवत असेल, तर आम्ही त्या भांडणात पडणार नाही. आम्ही तो निर्णय जनतेवर सोपवणार आहोत.
शरद पवार म्हणाले, शपथ विधी बाबत मला कल्पना नव्हती. काहींनी मला फोन केला होता. पण त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली व नंतर आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले. पुढे ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारी आहे, असे वक्तव्य केले होते. मात्र आज झालेल्या शपथ विधी नंतर पंतप्रधानांचा हा आरोप खोडून निघाला आहे. येत्या 6 जुलैला राष्ट्रवादीची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्यात येणार होते. मात्र, त्या आधीच आमच्या काही सहकार्यांनी पक्षा पेक्षा वेगळी भूमिका घेतली.
माझ्यासाठी हे नवीन नाही. 1980 ला देखील काही लोक आम्हाला सोडून गेले होते. पण जे पक्ष सोडून गेले ते पराभूत झाले. आता पुन्हा एकदा आम्ही पक्ष बांधणीसाठी मी राज्यभर फिरणार आहे. उद्या कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेवून पुन्हा नव्याने पक्ष बांधणीसाठी मी देशभर फिरणार आहे.
दरम्यान मी खंबीर आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलेली असून अजित पवारांचं शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होणे हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे, अशी ही प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नऊ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1558 पदांची भरती; पात्रता 10वी पास
ऊसतोडणी कामगारांना सुविधा देणार – साखर आयुक्त व समाज कल्याण आयुक्त यांची ग्वाही
‘आम्ही अजितदादांबरोबर…’, बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी; मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव