Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर : लेण्याद्री कोव्हीड केअर सेंटरची खा. कोल्हे यांनी केली पाहणी

जुन्नर : लेण्याद्री कोव्हीड केअर सेंटरची खा. कोल्हे यांनी केली पाहणी

लेण्याद्री (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री कोविड केअर सेंटरची आज (दि. २९) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाहणी केली. तसेच याठिकाणी उपचारासाठी दाखल झालेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चांगले उपचार अन्य सोयीसुविधा मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

तसेच खा. कोल्हे यांनी तालुका आरोग्य अधिकारी व कोविड केअर सेंटरचे स्टाफ यांच्याकडून सद्य:स्थितीची माहिती जाणून घेतली. त्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कोविड सेंटर बाहेर उपस्थित रुग्णांच्या पालक व नातेवाईकांशी संवाद साधला. त्यांंच्या समस्या व अडचणी देखील जाणून घेतल्या.

याप्रसंगी आमदार अतुल बेनके, चेअरमन सत्यशील शेरकर, सभापती विशाल तांबे, लेण्याद्री देवस्थान ट्रस्टी जितेंद्र बिडवई, जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्रामीण रुग्णालय नारायणगावचे डॉ.योगेश आगम (एम.एस.), जिल्हा पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे यांच्यासह कोविड केअर सेंटरमधील कर्मचारी व अन्य उपस्थित होते.

अधिक वाचा

जुन्नर : आमदार बेनके व कुटुंबियांकडून कोव्हीड केअर सेंटरला लाखोंंची मदत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय