Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयधक्कादायक : आयआयटी खरगपूर मधील प्राध्यापिकेची अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जातीवाचक शिवीगाळ

धक्कादायक : आयआयटी खरगपूर मधील प्राध्यापिकेची अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जातीवाचक शिवीगाळ

कोलकत्ता : खरगपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापिकाचे काही धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे अनेक विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांनी त्या प्राध्यापिकाने राजीनामा देण्याची मागणी केली आहे. 

ऑनलाइन क्लास दरम्यान “सीमा सिंग” या महिला प्राध्यापिका अनुसूचित जाती जमाती आणि अपंगासाठी इंग्रजीचे विशेष प्रशिक्षण देण्यात येत असलेल्या क्लासामध्ये शिकवताना विद्यार्थ्यांना जातीवाचक शिवीगाळ करत आहेत. त्यावेळी सर्व विद्यार्थी शांत ऐकत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना परिक्षेत नापास करण्याची धमकी देताना दिसत आहे. तसेच माझ्या वर्गातून जर बाहेर गेले तर माझ्याकडे तुमचे २० गुण आहेत, १२८ विद्यार्थ्यांना ० गुण देईल अशी धमकी प्राध्यापिकाने याआधी दिलेली आहे. 

तसेच भारत सरकारच्या महिला आणि बाल कल्याण किंवा अनुसूचित जनजाती विभागाकडे जरी तक्रार केली तरी माझा नापास करण्याचा निर्णय कोणी बदलवू शकत नाही असे प्राध्यापिका विद्यार्थ्यांना याआधी म्हणल्या असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राध्यापिकेच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by APPSC IIT Bombay (@appsc.iitb)

दुसऱ्या व्हिडिओमध्ये सदर प्राध्यापिका विद्यार्थ्याच्या घरी मृत्यू झाल्यामुळे विद्यार्थ्याने सराव परिक्षेमध्ये सूट मागितली असता, “मी एक हिंदू आहे, मला माहिती आहे कोणते विधी केले जातात ते, तसेच कोरोनामूळे त्यामध्ये सहभागी होता येणार नाही” यामधून विद्यार्थ्यांवरती घरात झालेल्या मृत्यूमूळे पडणाऱ्या मानसिक परिणामांबाबत विचार करताना दिसत नाही. आपण कट्टर हिंदू असल्याचे सामान्यपणे अनुसूचित जाती जमाती आणि अपंग विद्यार्थ्यांना जाणिव करून देण्याचा भाव दिसून येत आहे.

तिसऱ्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना क्लासमध्ये “भारत माता कि जय” म्हणण्यासाठी ओरडून सांगत आहेत आणि “कमीत कमी एवढे तर तुम्ही तुमच्या देशासाठी करू शकता” असे सांगत आहे.

आयआयटी खरगपूरच्या रजिस्टार आणि प्राचार्य यांनी अशा गोष्टींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांकडुन अशा प्राध्यापकाला नोकरीतून बडतर्फ करून त्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या अंतर्गत केस नोंदवावी अशी मागणी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय