Thursday, May 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पिंपरी : उद्यानामध्ये केलेल्या देखभालीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 17 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहायक उद्यान निरीक्षकाला एसीबीने रंगेहाथ पकडले.किरण अर्जुन मांजरे (वय 46) असे सहायक उद्यान निरीक्षकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे कंत्राटदार आहेत त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामध्ये उद्यान देखभालीचे काम घेतले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी सहाय्यक उद्यान निरीक्षक मांजरे यांनी 17 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी नेहरूनगर येथील गुलाबपुष्प उद्यानात लाच स्वीकारताना मांजरे याला रंगेहाथ पकडले. त्याच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस अंमलदार सुनील सुरडकर, सौरभ महाशब्दे, पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली.

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी


Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती



MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय