Sunday, December 8, 2024
HomeराजकारणKolhapur Violence : संदीप देशपांडेंसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

Kolhapur Violence : संदीप देशपांडेंसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर : मनसे नेते संदीप देशपांडेंसह अन्य 8 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37, 135 अन्वये कोल्हापुरात झालेल्या निदर्शनेनंतर औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

कोल्हापूर व अहमदनगर येथे औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून वाद उफाळून आला. याच्या निषेधार्थ दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने बुधवारी (दि.७ जून) आंदोलन केले. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथे औरंगजेबाचा पुतळा जाळला. यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37, 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुत्ववाद्यांचं हिंसक आंदोलन; इंटरनेट सेवा खंडित

औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. शहराच्या अनेक भागांत दगडफेक, तोडफोडीने दंगल उसळली होती. त्यात दोनशेवर वाहने, दुकाने, टपर्‍या, घरांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी लाठीमार केला. सुमारे तीन तासांनी दंगल नियंत्रणात आली.

दगडफेक, तोडफोडप्रकरणी ५० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे; तर दगडफेक, तोडफोडीत पोलिसांसह ६० जण जखमी झाले. दंगल लक्षात घेऊन प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा खंडित केली.

हे ही वाचा :

राज्य सरकारची मान शरमेने खाली घालणारी “ही” बाब…

कोल्हापुर : संभाजीराजे छत्रपतींनी संताप केला व्यक्त, दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र हादरला! हत्येनंतर मृतदेहाचे केले तुकडे; नंतर कुकरमध्ये उकळले

नागपूर : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

ICAR : सोलापूर येथील राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय