Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्तांचे लाचलुचपत प्रतिबंधक...

शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्तांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र

मुंबई : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार असून 36 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लिहिले आहे.

पडलेल्या छाप्याची खुली चौकशी करण्याची मागणी

शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात. मात्र, पुन्हा सेवेत येतात, पुन्हा भ्रष्टाचार करतात पण कारवाई होत नाही. त्यामुळे ज्या शिक्षकांवर छापे पडले त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी एसीबीला लिहिलेल्या पत्रात सूरज मांढरे यांनी मागणी केली आहे. काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून भ्रष्ट कारभाराची कीड लागली आहे. शिक्षक बदल्यांसाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. शिक्षक बदलीच्या फायलीवर आर्थिक वजन ठेवल्यानंतर शिक्षकांना सोयीच्या जिल्ह्यात बदली झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षात आपण पाहिली आहे. एवढच काय तर शिक्षक बदलीसाठी दरपत्रक देखील ठरल्याच्या चर्चा आहेत. साधी फाईल एका टेबल वरून दुसऱ्या टेबलवर पाठवण्यासाठी देखील पैसे घेतले जातात. एका प्रकरणात आउटवर्ड करून देण्यासाठी वीस हजार रुपयेची लाच घेण्यात आली. साधा लिपिक देखील मोठ्या कारमध्ये येतो. पैशाच्या मोबदल्यात बदल्या केल्या जातात.

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे दर पत्रक :

कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी – एक ते दीड लाख रुपये

शालार्थ प्रकरणांसाठी – 80 हजार ते एक लाख रुपये

मेडिकल बिल मंजुरीसाठी – बिलाच्या रकमेच्या पाच ते 20 टक्क्यांंपर्यंत

शिक्षक बदलीसाठी – 50 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय