Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड'गायींची कत्तल करण्यात गैर काय ?' मंत्री के.व्यंकटेश यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक;...

‘गायींची कत्तल करण्यात गैर काय ?’ मंत्री के.व्यंकटेश यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक; तर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा पलटवार

कर्नाटक : “म्हशींची कत्तल होऊ शकते तर गायींची का नाही?” असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील पशुपालन मंत्री के.व्यंकटेश यांनी शनिवारी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाल्याची पाहिला मिळाली. राज्यभरात भाजपाने विरोध दर्शवला.

कर्नाटकात भाजपा सरकारने २०२१ साली गोहत्या प्रतिबंध कायदा तयार केला होता. या कायद्यावर काँग्रेस सरकार आता अधिक संशोधन करणार असल्याचे संकेत पशुपालन मंत्री के व्यंकटेश यांच्या या वक्तव्यातून मिळत आहेत. “वय झालेल्या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो”, असंही व्यंकटेश म्हणाले होते.

“काँग्रेसने जाहीरनाम्यात केलेल्या आश्वसानांबाबत आंदोलन करण्याचा भाजपाला नैतिक अधिकार नाही”, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. “भाजपा हा लोकविरोधी पक्ष आहे. त्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा त्यांनी राज्याला लुटलं. इंदिरा कॅन्टिन, सौभाग्य आणि विद्यार्थ्यांना सायकल या योजना त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्याच नाहीत, असंही सिद्धरामय्या म्हणाले.

पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी


पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 171 पदांची भरती; 12वी, पदवी, ANM, GNM, MSW, पदव्युत्तरांना नोकरीची संधी


परभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 पदांची भरती; 8वी, 10वी, ITI उत्तीर्णांना संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय