महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी !
पिंपरी दि.३ जून : कोरोना विषाणू मुळे समान्याच्यां हाताचे काम गेले, व्यावसाय मेटाकूटीला आले, अर्थव्यवस्था कोंडलेली आहे. सामान्य व कष्टकरी वर्गाला परवडनारे पामतेलाच्या किमंतीने ही उच्चांक गाठला आहे. आता पेट्रोल, डिझेल तर वाढले च पण त्याच्या दिडपट किंमत खाद्यतेलाच्या पाकिटाला मोजावी लागत आहे हे केंद्र सरकारचे अपयश असुन अच्छे दिन ऐवजी बूरे दिन आले आहेत, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यानी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे खाद्यतेल आणि महागाईच्या विरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली
महासंघाने पत्रकात म्हटले आहे की कोरोना विषाणू च्या भयानक परिस्थिती ची पूर्ण कल्पना केंद्राला असतानासुद्धा देशभरामध्ये कोरणा विषाणू रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेवर करण्यात आल्या नाहीत, त्याचबरोबर कोरोणामुळे अर्थ व्यवस्था कोलमडलेली असताना अनेक गंभीर परिस्थितीतून आपला देश जात आहे.
खाद्यतेलाच्या किमतीं मध्ये ११ वर्षातील सर्वात उच्चांकी दर वाढ झालेले आहे. पाम तेलाची किंमत ही सुद्धा गेल्या अकरा वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा १३२ रु. याचा दर झाला आहे तर इतर तेलाच्या किमती १६५ रु. पर्यंत आहेत. भारताला दरवर्षी २३० लाख टनांची खाद्यतेलाची आवश्यकता आहे, त्यात भारतात केवळ ८० लाख टनाचा पुरवठा देशातील बियाणांच्या उत्पादनातून पूर्ण होतो, आवश्यक ७० टक्के तेलाच्या आयातीवर केंद्र सरकारने ५० टक्के शुल्क वाढवले आहे. याचाच परिणाम म्हणून तेलाच्या किंमती वाढत असून महागाईच्या खाईत सर्वसामान्यांना आणि कष्टकऱ्यांना ढकलण्याचे काम सरकारकडून केले जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे अर्थातच इतर सर्व गोष्टी महाग होत असल्यामुळे महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब मध्यमवर्गीय कष्टकरी वर्गाला अगदी मध्यम वर्गाला हे वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीने अक्षरश: त्रस्त झाले आहेत. हॉटेल सह इतर खाद्यपदार्थाच्या ही किंमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्यामुळे सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पाऊल उचलण्याची मागणी नखाते यांनी केली आहे.