Saturday, December 7, 2024
Homeग्रामीणमहसूल मंत्री यांच्या घरासमोर बिरसा क्रांती दल युवाचे 122 बेघर आदिवासी कुटुंबांसह...

महसूल मंत्री यांच्या घरासमोर बिरसा क्रांती दल युवाचे 122 बेघर आदिवासी कुटुंबांसह आंदोलन

रत्नागिरी : अहमदनगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील पुणतांबा- रास्तापूर येथील बेघर झालेल्या 122 आदिवासी कुटुंबाना घरकुले व उपजिवीकेसाठी जमीन तात्काळ द्यावी या मागणीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील बंगल्यासमोर 122 अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबे बेमुदत आंदोलन करणार असल्याची माहिती बिरसा क्रांती दल युवा आघाडी राज्याध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली. तशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंञी के.सी.पाडवी, जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलीस अधिक्षक अहमदनगर, तहसीलदार संगमनेर,  पोलीस निरीक्षक संगमनेर यांना देण्यात आली आहेत. 

निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील पुणतांबा- रास्तापूर येथील एकूण 122  भिल्ल आदिवासी समाजाच्या कुटुंबांना तेथील    प्रशासनाने  बेघर केल्यामुळे अन्यायग्रस्त कुटुंबांना घरकुल व उपजीवेकेसाठी जमीन व इतर मूलभूत सोयी देण्यात  याव्यात, अशा मागणीचे निवेदन राज्यभरातून अनेक आदिवासी संघटनांनी आपणास आजपर्यंत पाठविलेली आहेत. तसेच बिरसा क्रांती दल संघटनेने आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. तरी प्रशासनाने आमच्या निवेदनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत योग्य ती कोणतीच कार्यवाही केलेली नाही व 122 अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबाना बेघर करत उन्हात, वादळात, पावसा पाण्यात उघड्यावरच ठेवलेले आहे. ही एक गंभीर व लाजीरवाणी बाब आहे, असेही पावरा म्हणाले.

       


संबंधित लेख

लोकप्रिय