Tuesday, January 21, 2025

ओबीसी आरक्षण जोपर्यंत बहाल होत नाही तोपर्यंत निवडणूक घेवू नका – शब्बीर अन्सारी

अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आंदोलन उभारणार – शाहरुख मुलाणी

मुंबई : ओबीसी आरक्षण जोपर्यंत बहाल होत नाही तोपर्यंत निवडणूक घेवू नका असे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे संस्थापकीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इशारा दिला आहे. तर अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आंदोलन उभारणार असल्याचे संघटनेचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी सांगितले.

यावेळी अन्सारी म्हणाले की, देशपातळीवर ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. मी ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन संघटनेच्या माध्यमातून मागील 42 वर्षांपासून लढा देत आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यासाठी 15 महिने विलंब लावला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 27 टक्के मिळणारे आरक्षण गमावले. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने लवकर आयोगाची स्थापना करुन आपली बाजू न्यायालयात मांडावी. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेवू नये. आरक्षणाचा निर्णय सरकारने लवकर घेतला नाही तर संघटना राज्यात मोठे आंदोलन पंधरा दिवसांत उभे करणार आहे असा इशारा पत्रकार परिषदेत ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे संस्थापकीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी दिली आहे. 

तसेच त्यांनी यावेळी ओबीसी आरक्षण कसे गेले याबाबत बोलताना सांगितले की, एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, वाशिम येथे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाचा कोटा 50 टक्क्याहुन जास्त गेल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सरकारला आपले म्हणने मांडण्यासाठी वेळ दिला. तरीही वेळेवर आपली बाजू मांडली नसल्याने न्यायालयाने धक्का देणारा निर्णय दिला. दुर्बल घटकातील ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी हि संधी होती. ती आता नसल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. भाजपा आणि काँग्रेसवर आरक्षणाबाबत त्यांनी यावेळी टिका केली. 

देशाची जणगनना झाली तर ओबीसी समाज जास्त आहे. या समाजाने राजकारणात पुढे येवू नये. या समाजावर अन्य जाती धर्मांचेच राज्य राहावे यासाठी ओबीसी समाजाला दाबण्याचा राज्यकर्ते प्रयत्न करत आहे असा आरोप शब्बीर अन्सारी यांनी लावला आहे. तर अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जन आंदोलन उभारणार असल्याचे संघटनेचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी सांगितले आहे.

यावेळी ओबीसी नेते महेबुब खान, ऑर्ग. चे राष्ट्रीय प्रवक्ते मिर्झाअब्दुल कय्यूमनदवी, युवा अध्यक्ष गुफरान अन्सारी, वसीम अन्सारी, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, औरंगाबादचे मुस्लीम तेली समाज जिल्हाध्यक्ष अब्दुलसत्तार शेख, मिर्झाअबुल हासनअली हे उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles