Friday, May 17, 2024
Homeग्रामीणचांदवड : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त चांदवड तालुक्यातील डॉक्टरांचा शिवसेनेतर्फे सत्कार

चांदवड : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त चांदवड तालुक्यातील डॉक्टरांचा शिवसेनेतर्फे सत्कार

चांदवड (सुनिल सोनवणे) : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत वैद्यकीय क्षेत्रातील योद्धे डॉक्टर यांनी तालुक्यातील आव्हान पेलून तालुक्यातून कोरोना घालवण्यासाठी जी मेहनत घेतली व त्या सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर व त्यांचा सन्मान तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष नितीन आहेर, तालुकाध्यक्ष विलास भवर, तालुका संघटक केशव ठाकरे, प्रसाद प्रजापत, घमाजीराजे सोनवणे यांनी शहरातील व तालुक्यातील डॉक्टरांच्या हॉस्पिटलला जाऊन सत्कार व सन्मानपत्र दिले.

चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे डॉ. सुशील कुमार शिंदे, डॉ. पालवे, डॉ. देवडे, डॉ. फैजल, डॉ. निकम तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी स्टाफचे अभिनंदन व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

चांदवड शहरातील सर्व हॉस्पिटलला जाऊन सर्व खाजगी डॉक्टरांचा सुद्धा सन्मानपत्र देऊन कोरोना काळात केलेल्या कामात बद्दल गौरवण्यात आले, त्याचप्रमाणे तालुक्यातील वडाळीभोई, चांदवड, काजी सांगवी येथील डॉक्टरांचा सुद्धा सत्कार व प्रशस्तीपत्र देऊन त्यांनाही गौरविण्यात आले. काजी सांगवी येथे पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे यांना सत्कार व सन्मानपत्र घमाजीराजे सोनवणे यांनी दिले. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय