Friday, April 19, 2024
Homeजिल्हाडाॅक्टर दु:खं मुक्तीचा मार्ग असतो - मोहन मिणचेकर

डाॅक्टर दु:खं मुक्तीचा मार्ग असतो – मोहन मिणचेकर

कोल्हापूर : हजारो वर्षापासून डाॅक्टर जीवदानाचे काम करत आहेत. आपल्याला डाॅक्टरांशिवाय कोणीही वाचवू शकत नाही. एका श्वासाचं आयुष्य दीर्घायुष्यी फक्त डाॅक्टरांमुळे होते. कारण डाॅक्टर हा दु:खं मुक्तीचा मार्ग असतो. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मोहन मिणचेकर यांनी केले. ते डाॅक्टर्स डे च्या निमित्ताने आदित्य सभागृह येथे बोलत होते.

 

निर्मिती विचारमंच आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 1 जुलै रोजी डाॅक्टर्स डे च्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या डाॅक्टरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यामध्ये डाॅ. नरेंद्र  पाटील, डाॅ. राजकुमार बागल, डाॅ. संतोष कांबळे, डाॅ. गोविंद चंदनशिवे यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन मिणचेकर आणि शिक्षक नेते अमित मेधावी यांच्या हस्ते शाल, गुलाब पुष्प व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. 

यावेळी बोलताना अमित मेधावी म्हणाले, आज समाजभान असणारे डाॅक्टर तयार व्हायला हवेत. कारण त्यांना लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य खर्च करायचे असते, मदर तेरेसांचा वारसा जपायचा असतो. पण समाज म्हणून आपलीही काही जबाबदारी असते. डाॅक्टर संवेदनशील असतात तेवढेच समाजानेही संवेदनशील असायला हवे. यावेळी डाॅ. नरेंद्र पाटील, डाॅ. राजकुमार बागल, डाॅ. संतोष कांबळे, डाॅ. गोविंद चंदनशिवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल म्हमाने यांनी केले. यावेळी मंदार पाटील, विजय कोरे यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय