Wednesday, May 1, 2024
Homeग्रामीणलखीमपूर घटनेच्या विरोधात माकप व किसान सभेचे वणीत निदर्शने

लखीमपूर घटनेच्या विरोधात माकप व किसान सभेचे वणीत निदर्शने

वणी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे  शांततामय आंदोलन करून परत जाणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलगा आशिष मिश्र ह्याने मागाहून  अंगावर वाहन चालवून शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडण्याचे महा घातकी दुष्कृत्य केले. ह्याचा निषेध म्हणून दि. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट बंद चे आयोजन करण्यात आले होते, त्यानिमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर निदर्शने करण्यात येऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

केंद्रीय  गृह राज्यमंत्री यांच्या राजीनामा घेण्यात यावा, लखीमपूर घटनेची निष्पक्ष सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, वणी तालुक्यातील घोंसा परिसरातील वाघाचा बंदोबस्त करावा, नगर परिषद व ग्रामीण क्षेत्रातील घरकुल योजनेची योग्य अंमलबजावणी करावी, वणी ते वडगाव ( टीप ) , चारगाव चौकी ते मेंढोली व ढाकोरीबोरी रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, यवतमाळ जिल्हा ताबडतोब ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, वनाधिकार कायद्याच्या सुधारित २०१२ च्या नियमानुसार व तरतुदीनुसार दाव्याची फेरतपासणी करून वनहक्कांचे पट्टे देण्यात यावे आदी मागण्या ह्या निदर्शने आंदोलनात रेटण्यात येऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

ह्या आंदोलनात कॉ. शंकरराव दानव, कॉ. दिलीप परचाके, कवडू चांदेकर, वंचित चे मंगल तेलंग, संभाजी ब्रिगेड चे अजय धोबे, आनंदराव पानघाटे, किशोर मून व अन्य अनेक गावातील माकप व किसान सभेचा असंख्य कार्यकर्त्यानी सहभाग घेतला होता.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय