Thursday, January 16, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरस्त्यावर कचरा फेकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करा

रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करा

चिखली : शहरातील सौंदर्यावर भर घालणाऱ्या मुख्य भोसरी निगडी येथील स्पाईन रस्त्यावर नागरिक कचरा फेकत आहेत. दररोज या दुर्गंधीयुक्त कचऱ्याची विल्हेवाट लावताना स्वच्छता कर्मचारी हैराण झालेले आहेत.

भल्या पहाटे आणि रात्री ९ नंतर बेफिकीर नागरिक चोरपावलांनी येऊन गेले महिनाभर ओला आणि सुका कचरा टाकत आहेत. प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये व्हेज, नॉनव्हेज आणि टाकाऊ वस्तू याठिकाणी टाकल्या जातात. भाजीपाला, चिकन, मटणाचे स्क्रॅप मांस आणि सॅनिटरी नॅपकिन, जुन्या कपड्यांची गाठोडी आणून या ठिकाणी टाकली जातात. या कचऱ्याची विल्हेवाट लावताना मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना अतिशय दुर्गंधीयुक्त वातावरणात साफसफाई करावी लागते.

आरोग्य विभागाने या ठिकाणी कचऱ्याचे संकलन करण्यासाठी मोठी बिन ठेवूनही या बिन बाहेर दुर्गंधीयुक्त कचरा फेकला जातो. शहरातील हा स्मार्ट रस्ता शाहूनगर, शिवतेज नगर, घरकुल परिसराचे सौंदर्य आहे. पुढे चेरी चौक, त्या ठिकाणी खाद्य पदार्थ, भाजीपाला याचे व्यवसाय आहेत. दररोज मनपाचा एक ट्रक आणि त्यांचे कर्मचारी रस्त्याच्या कडेचा कचरा गोळा करून वैतागून गेलेले आहेत. हा रस्ता अद्यापही सीसीटीव्ही फुटेज मध्ये नसल्यामुळे इथे कचरा टाकणाऱ्या नागरिकांचा स्वैराचार दिसून येतो. संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी सुजाण नागरिकांची मागणी आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय