Friday, November 22, 2024
Homeजिल्हा'शिक्षण वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा' घोषणा देत SFI चा अखिल भारतीय...

‘शिक्षण वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा’ घोषणा देत SFI चा अखिल भारतीय जत्था उद्या पुणे विद्यापीठात

पुणे : ‘शिक्षण वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा’ घोषणा करत SFI चा अखिल भारतीय जत्था उद्या दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी पुणे विद्यापीठात येणार आहे. सकाळी ठिक ११:०० वाजता, संविधान स्तंभ, मुख्य इमारत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी व जिल्हा सचिव नवनाथ मोरे यांनी केले आहे.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI हे राष्ट्रीय अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हैद्राबाद येथे पार पडणार आहे. SFI च्या राष्ट्रीय अधिवेशनाचे औचित्य साधत केंद्रीय समितीने शिक्षण वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा ही मुख्य घोषणा देत ”शिक्षणासाठी मार्च” करत श्रीनगर आणि कन्याकुमारी येथून काढण्यात आले आहेत. SFI चा अखिल भारतीय जत्था मागील १ ऑगस्टपासून संपूर्ण देशभर फिरत आहे. हा जत्था महाराष्ट्रात ११ सप्टेंबर पासून औरंगाबाद, बीड, नांदेड, सोलापूर असे करत पुण्यात गुरूवार दिनांक १५ सप्टेंबर,२०२२ रोजी आगमन होईल. त्यानिमित्ताने SFI पुणे जिल्हा समितीच्या वतीने जत्थाचे स्वागत व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या जाहीर सभेला मुख्य मार्गदर्शन राष्ट्रीय सहसचिव तथा जेएनयू विद्यार्थी नेत्या दिपसीता धर मुख्य मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती राज्याध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य सहसचिव नितीन वाव्हळे, मलेशम कारमपुरी, छत्तीसगड राज्य निमंत्रक अर्चना हे मार्गदर्शन करणार आहेत.

या जाहीर सभेच्या कार्यक्रमात नवीन शैक्षणिक धोरण, शिष्यवृत्ती, शिक्षण क्षेत्रात वाढते खाजगीकरण, बाजारीकरण, केंद्रिकरण, शिक्षणामध्ये वाढते जातीभेद, शिक्षणाचे वाढते भगवीकरण, धर्मांधिकरण, वाढती बेरोजगारी, मुलींचे प्रश्न यावर चर्चा होणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय