Thursday, April 25, 2024
HomeNewsमहिला भक्तांची छेड कडून फरारी असलेला लोमटे महाराज 45 दिवसानंतर पोलिसांच्या ताब्यात...

महिला भक्तांची छेड कडून फरारी असलेला लोमटे महाराज 45 दिवसानंतर पोलिसांच्या ताब्यात !

महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी फरार असलेला स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लोमटे महाराजाने महिला भक्ताचा विनयभंग केला होता.

 महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी फरार असलेला स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लोमटे महाराजाने महिला भक्ताचा विनयभंग केला होता.

लोमटे महाराजाविरोधात यापूर्वी भोंदूगिरी करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. याच महाराजाने महिला दर्शनासाठी आली असता तिचा विनयभंग केला. इतकच नाही तर मी तुला गुंगीचं औषधं देऊन तुझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ देखील शूट केल्याची धमकी देखील लोमटे महाराजाने पीडित महिलेला दिल्याची माहिती समोर आली. या पीडितेच्या तक्रारीवरून लोमटे महाराजांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाला होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय