Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने पुणे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान – काशिनाथ नखाते

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने पुणे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान – काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड : वेदांत – फॉक्सकॉन प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे होणाऱ्या प्रकल्पातून सुमारे १ लाख २० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुमारे १.५४ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प पिंपरी चिंचवड जवळच्या तळेगाव येथे होणार होताा. मात्रर, हा प्रकल्प पद्धतशीर पणे शिंदे- फडणवीस सरकारने गुजरातला जाऊ दिला. त्यामुळे पिंपरी चिंचवड सह पुणे जिल्ह्यातील लाखो तरुणांच्या तोंडचा घास पळवला त्याचबरोबर या उद्योजकावर अवलंबून असणारे अनेक छोटे-मोठे उद्योग वाहतूक व्यवस्था अशा प्रचंड लाखो लोकांचे नुकसान झाले अशी टीका कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघाने याबाबत पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यांमध्ये हा प्रकल्प व्हावा म्हणून महाविकास आघाडी सरकारने अनेक प्रयत्न केले तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी प्रयत्न करून लवकरच हा प्रकल्प तळेगाव येथे सुरू होणार होता. मात्र, महाराष्ट्राचे महत्त्व कमी करून गुजरातचे महत्त्व वाढवण्याचा प्रमाण जे वाढत आहे ते या कंपनीच्या स्थलांतरामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पुणे जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणच्या कार उत्पादक कंपन्यांमध्ये सेमीकंडक्टरची मायक्रोचीप व डिजिटल उत्पादनामध्ये लागणाऱ्या चीप चा अनेक दिवसापासून तुटवडा असल्याने कार खरेदी व विविध वस्तू खरेदीसाठी त्यांना तीन महिने, सहा महिने, वर्षभर प्रतीक्षेत राहावे लागत आहे ही तूट भरून काढण्यासाठी पुण्यामध्ये हा प्रकल्प अत्यंत गरजेचा होता. मात्र, तसे झालेले नाही तळेगाव येथे हा रोजगार आल्यास १ लाख २० हजार पेक्षा अधिक कामगार -कर्मचारी कष्टकरी कामगार यांचा नोकरी उपलब्ध होऊन फार मोठा फायदा झाला असता.

सदरची कंपनी येण्याने या कंपनीला सुटे भाग उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचां हि फायदा होणार होता, तसेच इतर छोट्या मोठ्या उद्योगालाही चालना मिळाली असती. मात्र, हा महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील तरुणांच्या तोंडचा घास हिरावून गेला आहे, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनीही हा गेलेला प्रकल्प परत महाराष्ट्रात आणावा अशी मागणी केली आहे.

त्याचबरोबर, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे, हा प्रकल्प गेल्यामुळे महाराष्ट्रवाशियामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली असल्याचे मतही नखाते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय