Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडChinchwad Vidhan Sabha 2024 : अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा महायुतीचे उमेदवार...

Chinchwad Vidhan Sabha 2024 : अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा

पंतप्रधान मोदी आणि महायुती सरकारचे हात बळकट करण्यासाठी पाठींबा (Chinchwad Vidhan Sabha 2024)

शंकर जगताप यांच्या विक्रमी विजयाचा केला विश्वास व्यक्त

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जगताप यांना दिले पाठींब्याचे पत्र


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी जगताप यांना पाठींब्याचे पत्र दिले आहे. (Chinchwad Vidhan Sabha 2024)

शंकर जगताप यांना शहरातील विविध सामाजिक संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी 52% समाजाची सामाजिक संघटना असून यामध्ये कर्मचारी आघाडी, विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी तसेच शेतकरी आघाडी व ऑल इंडिया गोर बंजारा समाज संघटना यांचा समावेश आहे. संघाने पाठिंबा जाहीर करत जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व ओबीसी समाजबांधवांना केले आहे.

याप्रसंगी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार, कार्याध्यक्ष नानासाहेब टेंगळे, प्रसिद्धीप्रमुख कादंबरी वेदपाठक, पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा शोभा झिंगाडे, पुणे शहराध्यक्ष निलेश ढहाळे, भाजपा मंडल उपाध्यक्ष ललित म्हासेकर, स्वप्निल नावडे यांच्यासह संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या वतीने उमेदवार शंकर जगताप यांचे “कमळ” चिन्हावर शिक्कामोर्तब करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी केले आहे. (Chinchwad Vidhan Sabha 2024)

सर्वप्रथम मी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष हनुमंत सुतार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे व सर्व ओबीसी समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी दिलेला पाठींबा या विधानसभा निवडणुकीच्या लढाईत आम्हाला नक्कीच बळ देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकार हे नेहमीच ओबीसी बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध असून भविष्यात पिंपरी चिंचवड शहरातील आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ओबीसी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सातत्यपूर्ण पाठपुरावा करेन. व आपल्या समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करेन.

शंकर जगताप
(महायुतीचे उमेदवार)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी

लग्नसराईत सोनं झालं स्वस्त ; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय