एक हात मदतीचा सामाजिक उपक्रम (ALANDI)
आळंदी / अनिराज मेदनकर : येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रशालेतील ‘विद्यार्थी सहाय्यक समिती अंतर्गत एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या अनाथाश्रम, वृद्धाश्रम, नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी मदत करून सामाजिक बांधिलकी जपली जाते. (ALANDI)
तीच मदतीची उज्वल परंपरा या वर्षी कायम ठेवत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर बालक मंदिर, ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर तसेच ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी यांच्या वतीने स्नेहवन अनाथाश्रम, कोयाळी, खेड व नैसर्गिक शिक्षा संशोधन व प्रशिक्षण संस्था, देवली (मळवली) मावळ यांना तब्बल ८० हजार रुपयाच्या किराणा मालाची मदत करण्यात आली. (ALANDI)
तसेच प्रशालेत स्वच्छता कर्मचारी चार मावशींना दीपावली निमित्त साडी भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यामध्ये संस्था, सर्व विभागातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी भरघोस अशी आर्थिक मदत करून जमा रकमेतून दोन्ही अनाथाश्रमांना प्रत्येकी ४० हजार रुपये किमतीचा किराणामाल सुपूर्त करण्यात आला.
या प्रसंगी स्नेहवन अनाथाश्रमाचे बाबाराव देशमाने व नैसर्गिक शिक्षा संशोधन अनाथाश्रमाचे अल्हाद टपाले व त्यांचे सहकारी तसेच संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, संस्थेचे सदस्य योगेंद्र कुऱ्हाडे, शहाजी कर्पे, आनंदराव मुंगसे, जगदीश भोळे, अनिल वडगावकर, सदाशिव येळवंडे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
या कार्यासाठी विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने प्रज्ञा यादव, सूर्यकांत खुडे, रामदास वहिले यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी अल्हाद टपाले, माणिक काळे, अजित वडगावकर, डॉ. दीपक पाटील, आनंद मुंगसे यांनी हि मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक अनिता पडळकर यांनी केले. सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले. प्रदीप काळे यांनी आभार मानले.
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित