SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः गणित आणि विज्ञान या दोन विषयांमध्ये पास होण्याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.नव्या अभ्यासक्रम आराखड्यानुसार आता या दोन विषयांत 35 गुणांऐवजी 20 गुण मिळाले तरी विद्यार्थी पास होऊ शकतो.
विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 गुण प्राप्त करणे आवश्यक असते. मात्र, आता दोन विषयांसाठी हा नियम बदलण्यात येऊ शकतो. नव्या अभ्यासक्रम आराखड्यानुसार बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 20 ते 35 गुण मिळाले तरीही विद्यार्थ्याला पुढील शिक्षण घेता येणार आहे.अशा विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेता येणार आहे, मात्र त्यांच्या गुणपत्रिकेवर विशिष्ट शेरा असणार आहे.
विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय असतील – प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे. याबाबत काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.पण, हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर करायचे नाही. ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
या निर्णयावर शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. “गणित आणि विज्ञान हे भविष्यातील तंत्रज्ञानाधारित नोकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यांच्या मते, गणित आणि विज्ञान हे भविष्यातील नोकऱ्यांसाठी अत्यावश्यक विषय आहेत आणि फक्त पास करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान आणि कौशल्ये मिळणे महत्त्वाचे आहे.
“गणित आणि विज्ञानात पास होण्याऐवजी या विषयांमध्ये गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांना तज्ञ बनवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, फक्त पास होणाऱ्यांची संख्या वाढवून हा प्रश्न सुटणार नाही,” असे हेरंब कुलकर्णी म्हणाले.
या निर्णयावर सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पुढील काळात हा निर्णय कितपत यशस्वी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
SSC Exam
हेही वाचा :
पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला भीषण आग
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान
सलमान खानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी
देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती