Thursday, November 21, 2024
Homeजिल्हाPune : होम मिनिस्टरच्या खेळात महिलांनी लुटला मनमुराद आनंद

Pune : होम मिनिस्टरच्या खेळात महिलांनी लुटला मनमुराद आनंद

पैठणीसोबतच आकर्षक बक्षिसांचा वर्षाव; सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम (Pune)

Pune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने कळस व टिंगरे नगर येथे महिलांसाठी होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा, आदर स्त्री शक्तीचा) कार्यक्रमाचे आयोजन (ता. १३) करण्यात आले होते. कळस येथील गंगा कलश सोसायटी तसेच टिंगरे नगर येथील तिरुपती स्पोर्ट्स प्ले ग्राउंड येथे कार्यक्रम संपन्न झाला. मोठ्या संख्येने यावेळी महिलांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे तसेच माजी नगरसेविका संजीला पठारे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते महिलांना बक्षिसे वाटण्यात आली. (Pune)

तत्पूर्वी, दसऱ्यालाही धानोरी येथे फाऊंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोन्ही ठिकाणी पैठणीसोबतच फ्रीज, टीव्ही, मिक्सर, मायक्रोवेव्ह, गोल्ड प्लेटेड दागिने, पारंपरिक नथ, चांदीचे छल्ले, डिनर सेट इ. बक्षिसे वाटप करण्यात आली. प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. (Pune)

“नवरात्र उत्सवाची सांगता एका चांगल्या कार्यक्रमाने करण्याचा विचार होम मिनिस्टरच्या रूपात प्रत्यक्षात उतरला. महिला भगिनी आपल्या रोजच्या दैनंदिन धावपळीतून वेळ काढून मोठ्या संख्येने एकत्र आल्या. विविध खेळ खेळत आनंद साजरा केला. मनोरंजनासोबतच नव्या ओळखी, जिव्हाळा तसेच सहकार्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. तिन्ही ठिकाणी ठरल्याप्रमाणे कार्यक्रम पार पाडता आला, याचे समाधान आहे”, असे म्हणत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी महिला भगिनींचे आभार व्यक्त केले.

“नियोजनपूर्ण अशा पद्धतीचे आयोजन सुरेंद्र पठारे फाऊंडेशनने आम्हा महिलांसाठी केले. सगळ्या महिला एकत्र आल्या आणि मनमुरादपणे खेळ खेळल्या आणि जिंकल्याही. या महिलांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे”, असे माजी नगरसेविका संजीला पठारे यांनी यावेळी बोलताना म्हणाल्या.

“महिला शक्तीचा जागर करण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. केवळ घरकामातच नाही, तर महिला भगिनी विविध क्षेत्रात आज आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा चांगला उपक्रम राबवला आहे”, असे मत व्यक्त करत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनीदेखील कार्यक्रमाचे कौतुक केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता

बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू

आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट

महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा

दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर

संबंधित लेख

लोकप्रिय