घोडेगाव : आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश मिळावा यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने दि. ७ ऑक्टोबर पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात होते. तिसऱ्या दिवशी धरणे आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्यात आले. आज (दि.१२) पाचव्या दिवशी रात्री ११ वाजता झालेल्या चर्चेत सोमवारी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्याने संघटनेच्या वतीने आंदोलन स्थगित करण्यात आले. (Ghodegaon)
तिसऱ्या दिवशी सुरू झालेल्या आमरण उपोषणास राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, जिल्हा सहसचिव समीर गारे, जिल्हा कमिटी सदस्य राजू शेळके, संस्कृती गोडे हे बसले होते. सोमनाथ निर्मळ यांची प्रकृती खालावल्याने शासनाने अत्यंत वेगाने निर्णय प्रक्रिया करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.
वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश देण्यात यावा मागणीवर सकारात्मक चर्चा होऊन विद्यार्थ्यांना सोमवारी (दि.१४) वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहेत. तर एकलव्य कुशल पोर्टल वर MSCIT, Tally, Typing, JEE, NEET या कोर्स चा समावेश करण्यात यावा. आश्रमशाळा व वसतिगृहातील पायाभूत सुविधांचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा. आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, मंचर येथील पाणी प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा. आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर कडे जाणारा रस्ता तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. शून्य फी शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांकडून वर्षानुवर्षे घेतलेली फी परत करण्यात यावी, सेन्ट्रल किचन व्यवस्था बंद करून पूर्वीप्रमाणे मेस पद्धत सुरु करण्यात यावी, थकीत शिष्यवृत्ती व स्वयंम डीबीटी वितरीत करण्यात यावी, या व अन्य मागण्यांवर चर्चा झाली, त्याची देखील लेखी सोमवार दि. १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी देण्यात येणार आहे. (Ghodegaon)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, पुणे जिल्हा, राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), बिरसा ब्रिगेड जुन्नर, ग्रामपंचायत राजपुर, फुलवडे, बोरघर, तेरूंगण, तिरपाड यांचे सरपंच व सदस्य प्रतिनिधींनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून सक्रिय पाठिंबा दिला.
दरम्यान, प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई यांच्या सोबत संघटनेच्या शिष्टमंडळाने रात्री ११ वाजेपर्यत चर्चा केली. चर्चेत सकारात्मक तोडगा निघाल्याने त्यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व एसएफआय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, पुणे जिल्हा अध्यक्ष दिपक वालकोळी, सचिव नवनाथ मोरे, सहसचिव समीर गारे, संदीप मरभळ, निशा साबळे, अक्षय घोडे, निकिता मेचकर, बाळकृष्ण गवारी, राजू शेळके, संस्कृती गोडे, समीक्षा केदारी, प्रविण गवारी, योगेश हिले, रोहिदास फलके, वृषाली दाभाडे, अंकिता मांडवे, ऋषाली दाभाडे, अभिषेक शिंदे, अक्षय साबळे, सुरज बांबळे आदींसह उपस्थित होते.
Ghodegaon
हेही वाचा :
दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर
नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू
मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन
युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!
सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!