काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या शुक्रवारपासून अतिशय मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे संपूर्ण नेपाळमध्ये महापुराची स्थिती निर्माण झालेली आहे. (Flood)
हा पाऊस अजिबात थांबलेला नसून त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले असून अडीचशेच्या वर घरे हे जमिनीखाली ढिगाऱ्यात गाडली गेलेली आहेत.
नेपाळमधील सर्व विमान उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. नेपाळच्या हवामान अंदाज विभागाने सलग चार दिवस रेड अलर्ट जारी केल्याने हे घडले. नेपाळमधील 77 पैकी 56 जिल्हे मुसळधार पावसाच्या तडाख्यात आहेत. (Flood)
पर्वतीय क्षेत्रामध्ये भूस्खलनामुळे देशातील 48 महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. राजधानी काठमांडूचा देशातील अनेक जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे.संपूर्ण प्रदेशात फक्त 3000 पोलीस आणि बचाव दले नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.