Saturday, October 5, 2024
Homeआंतरराष्ट्रीयHezbollah : काश्मीरमध्ये हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ इस्त्रायल विरोधात जोरदार निदर्शने

Hezbollah : काश्मीरमध्ये हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ इस्त्रायल विरोधात जोरदार निदर्शने

Hezbollah Nasrallah : काश्मिर मध्ये शिया आणि काही सुन्नी निदर्शकांनी हिजबुल्लाह प्रमुख नसरुल्लाहच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात इस्राएल आणि अमेरिकेच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

बैरूतमध्ये मारल्या गेलेल्या हिजबुल्लाह प्रमुखाच्या मृत्यूविरोधात काश्मीर मध्ये अचानक झालेल्या या निदर्शनास सरकारने परवानगी दिली होती काय असा सवाल समाज माध्यमावर विचारला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग, बडगाममध्ये हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले.

बैरूतमध्ये मारल्या गेलेल्या हिजबुल्लाह प्रमुख नसरुल्लाह (Hezbollah Chief Nasrallah) यांच्या मृत्यूविरोधात भारतात काही ठिकाणी निदर्शने होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनाबाद, रैनावारी, सैदाकदल, मीरबिहारी आणि आशाबाग भागात लहान मुलांसह मोठ्या संख्येने लोक काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले. मात्र, आंदोलन शांततेत पार पडले.

काही नेत्यांनी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला आणि अमेरिकेला या देशाच्या पाठिंब्यासाठी दोष दिला. निदर्शनांमुळे वाहतूक खोळंबली गेली.

गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सरकारने नसरुल्लाहच्या मृत्यूच्या संवेदनशीलतेच्या कारणाने शोक करणाऱ्यांना आपली भावना व्यक्त करण्याची मुभा दिली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल

संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

संबंधित लेख

लोकप्रिय