क्रीडा अधिकाऱ्यांची पालक व शिक्षकांना तंबी (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पुणे जिल्हा क्रीडा परिषद, पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आंतर शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ आयोजित करण्यात आल्या आहेत. (PCMC)
या अंतर्गत शनिवारी (दि. २८) चिंचवड, शाहूनगर येथील पंडित दीनदयाळ मैदानात (अटल बिहारी वाजपेयी उद्यानासमोर) सकाळ पासून आंतरशालेय खो खो च्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत.
या मैदानावर पावसामुळे सर्वत्र चिखल साचला असून अशा चिखलात खेळाडूंचा जीव धोक्यात घालून खो-खोच्या स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. काही पालक व क्रीडा शिक्षकांनी येथील त्रुटी आयोजकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याऐवजी तक्रारी कडे दुर्लक्ष केले आणि चिखलात साचलेल्या गाळात खो-खो स्पर्धा सुरू केल्या आहेत.
अशा धोकादायक पद्धतीने स्पर्धा घेण्याऐवजी मैदानावर सुविधा उपलब्ध करून देऊन मगच स्पर्धा घ्याव्यात. या पालक व क्रीडा शिक्षकांच्या मागणीकडे संबंधित अधिकारी व आयोजकांनी दुर्लक्ष करून विद्यार्थी खेळाडूंचा जीव धोक्यात घातला आहे. (PCMC)
दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. त्यावेळी मा. पंतप्रधानांचा नियोजित पुणे दौरा देखील रद्द करण्यात आला. तसेच त्याच दिवशी होणारी शालेय विद्यार्थ्यांची चित्रकलेची इंटरमीडिएट ची स्पर्धा देखील रद्द करण्यात आली होती. ती चित्रकलेची स्पर्धा आज होती.
अनेक विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेत आणि आज होणाऱ्या खो-खो च्या स्पर्धेत सहभागी झाले होते. एकाच वेळी दोन स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी देणे विद्यार्थ्यांना शक्य नव्हते. त्यामुळे अनेक पालक व क्रीडा शिक्षकांनी ही अडचण आयोजकांच्या निदर्शनास आणून दिली होती.
तरी देखील खो-खोच्या स्पर्धा आज खुल्या मैदानात चिखलात घेण्याचा हट्ट धरला. त्यामुळे अनेक विद्यार्थी घसरून पडले, किरकोळ जखमी झाले. त्यांना सक्षमपणे आपला नैसर्गिक खेळ करता आला नाही. या स्पर्धांचे वेळ किंवा ठिकाण बदलून शहरात उपलब्ध असणाऱ्या बंदिस्त क्रीडा संकुलात आयोजन करणे अपेक्षित होते.
भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा पुरस्कृत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे द्वारा विविध खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत दरवर्षी करण्यात येते. क्रीडा विभागाच्या योजने अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून नागरी व ग्रामीण क्षेत्रात सुसज्य क्रीडांगणे तयार करण्यासाठी क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत क्रीडांगण तयार करणे करिता ७ लाख अनुदान व क्रीडा साहित्यासाठी ३ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत व्यायामशाळा साहित्य व खुली व्यायाम शाळा साहित्यकरिता ७ लाख रुपये दिले जाते.
सन २०२२-२३ या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये पुणे ग्रामीण, पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील एकूण २६८३ शाळा मधील ३,३६,४०३ खेळाडूंनी सहभाग घेतला असून आत्तापर्यंतची ही विक्रमी आकडेवारी आहे.
या हेतूने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मनोगतामध्ये दिली आहे.
या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या शासनाच्या उद्देशालाच आजच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेल्या वर्तणुकीमुळे हरताळ फासला गेला आहे. अशा हेकेखोर आणि मनमानी करणाऱ्या क्रीडा अधिकाऱ्यांवर पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले