पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर प्रदुषण मुक्त होऊन हरीत शहर म्हणून नावारूपास यावे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमिताने शहरात विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड,मुर्ती दान केंद्र व निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे.अशी माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे. PCMC
यावेळी सचिन चिखले सर्व गणेश भक्तानां शुभेच्छा देताना म्हणाले की, विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश करून सुख, समाधान व आनंद प्रदान करो, हीच प्रार्थना! सर्वांना गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गणेशाचे आज आगमन होत आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी मनपा प्रशासनाने तयारी केली आहे.
पृथ्वीच्या पंचतत्वापैकी जलतत्वाचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. कृत्रिम कुंडात गणेश मुर्ती विसर्जन हा उपक्रम महापालिका कायमच राबवत असते. या उपक्रमास नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. याहीवर्षी प्रशासनाने हा उपक्रम राबविला आहे. (PCMC)
तसेच महापालिकेच्या वतीने निगडी यमुनानगर येथील कै.मिनाताई ठाकरे ग्राउंड “विसर्जन कुंड,मुर्ती दान केंद्र व निर्माल्य कलशांची” निर्मिती करण्यात आली आहे. फ क्षेत्रिय अधिकारी सिताराम बहुरे यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली आहे. नागरिकांनी, गणेश भक्त व मंडळांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिखले यांनी केले आहे.
***
***
***
***
***
***
***
***
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती