Tuesday, October 8, 2024
Homeजिल्हाMaval : साताबाऱ्यासाठी मावळ मध्ये माकपचा भरपावसात मोर्चा

Maval : साताबाऱ्यासाठी मावळ मध्ये माकपचा भरपावसात मोर्चा

वडगाव मावळ : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या वतीने आज गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी वडगाव मावळ तहसील कार्यालयावर सातबारा च्या प्रश्नासाठी प्लॉट धारकांचा भर पावसात मोर्चा काढण्यात आला. (Maval)

मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या गावांच्या हद्दीत एमआयडीसीत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या व आपल्या मुला बाळाच्या पोटाला चिमटा देऊन एक गुंटा अर्धा गुंट्याचे प्लॉट विकत घेतले असून या प्लॉटची 7/12 एकतर मूळ मालकाच्या नावे किंवा विकसकाच्या नावे असल्यामुळे अनेक समस्याना तोंड दयावे लागत आहे, यामुळे आपल्या जागेचा सातबारा आपल्या नावे असावं म्हणून प्लॉट धारक जेव्हा मंडल अधिकारी किंवा तलट्याकडे जातात. तेव्हा त्याना भरमसाठ पैशाची मागणी केल्या जाते आणी पैसे नाही म्हटल्यावर तुकडे बंदीचे कारण देऊन त्या संबंधित प्लॉट धारकांस टाळा टाळ करून मानसिक त्रास दिल्या जातो. अशा शेकडो तक्रारी पक्षाकडे उपलब्ध झाल्यामुळे आम्ही मागील तीन महिन्यापासून या प्रश्नावर मावळ तहसील प्रशासना सोबत वेळोवेळी पत्र निवेदन देऊन ही प्रशासनास जाग येत नसल्याने आम्ही आज श्रीमंत महादजी शिंदे उद्यान ते वडगाव मावळ तहसील कार्यल्य असा विराट मोर्चा काडून प्रशासनाच निषेध केला व तुकडे बंदीच्या जीआर ची जाहीर होळी केली, असल्याचे माकपचे जिल्हा सचिव गणेश दराडे म्हणाले.

तहसीलदारांना मागण्याचे निवेदन दिले. यावेळी तहसीलदारांनी या प्रश्ननासी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची उद्या बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले. हा मोर्चा माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांच्या नेतृवाखाली काढण्यात आला. या मोर्चाला मार्गदर्शन करताना कॉम्रेड गणेश दराडे म्हणाले की पुडील पंधरा दिवसात हा प्रश्न प्रशासनाने जर सोडला नाही तर याही पेक्ष्या तीव्र आंदोलन करण्यात येईल, याला पूर्ण जबाबदार मावळ प्रशासन असेल. (Maval)

या मोर्च्यात मोठया प्रमाणात महिला आपल्या लहान मुलांना घेऊन भर पावसात सहभागी झाल्या. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या नेत्या अपर्णा दराडे यांनीही मोर्चाला मार्गदर्शन केले. नामदेव सूर्यवंशी, विठ्ठल कदम, चंद्रकांत जाधव, सुभाष पतंगे, शिवसेन जणबंदू दीपक काशीद, बाबुराव खलाळ, ज्ञानेश्वर घोगरे,पावसू करे, बापू गायकवाड शंताराम खरनार, रंजित देवकरे, मारुती गायकवाड, हिम्मत कदम, संभाजी जाधव, महादेव सुरवसे, राजेश्वर कोक्लावर उत्तम कदम, डॉ. बाबासाहेब देशमुख, मीरा भांगे, जनाबाई जाधव, सोनाली जाधव, ताई मेंडाळे, पूनम मेंढाळे, शीतल जाधव, पार्वती सुरवसे, मनीषा जाधव, सोनाली ख्वाटे, अशोक उजागरे यांनी संयोजन केले. तर मोर्चाचे आभार कॉम्रेड सचिन देसाई यांनी मानले.

Maval

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

संबंधित लेख

लोकप्रिय